S M L

'रसगुल्ला' रेल्वे बजेट

24 फेब्रुवारीपश्चिम बंगालमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज 'रसगुल्ला' बजेट सादर केले.प्रवास भाड्यात वाढ नाहीत्यांनी रेल्वेच्या प्रवास भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. अन्नधान्य, खते, डिझेल आदींच्या वाहतुकीसाठी बजेटमध्ये सवलत देण्यात आली आहे.पडीक जमिनींचा विकास रेल्वेच्या पडीक जमिनींचा विकास दवाखाने तसेच इतर सुविधांसाठी करण्याचा निर्णय ममता यांनी आज जाहीर केला. तसेच कोल्ड स्टोअरेजची साखळी उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. यामुळे रोजगार निर्माण होईल, तसेच शेतकर्‍यांनाही फायद्या होईल, अशी प्रितिक्रिया व्यक्त होत आहे. रेल्वे परीक्षा स्थानिक भाषेत रेल्वे भरतीची परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच स्थानिक भाषांमध्येही देता येईल, अशी महत्त्वाची घोषणा आज ममता बॅनर्जी यांनी केली. देशभरात एकाच दिवशी ही परीक्षा घेतली जाईल. भूमिपुत्रांना रेल्वे भरतीत प्राधान्य देण्याची आमचीच मागणी होती. यामुळे या परीक्षेत आता पूर्वीप्रमाणे लबाडी होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी व्यक्त केली आहे.मुंबईला झुकते माप आपले दुसरे रेल्वे बजेट सादर करणार्‍या ममतांनी या वेळी मंुबईला झुकते माप दिले आहे. मुंबईला 101 नव्या लोकल देण्याची घोषणा त्यांनी बजेट सादर करताना केली. ठाणे, कसारा, बोरीवली आणि हार्बर मार्गावर या नव्या गाड्या धावतील. तसेच पनवेल, नेरूळ, ठाणे-वाशी मार्गावर महिला स्पेशल गाड्या सुरू होतील. 117 नव्या रेल्वे 7 महिन्यांच्या आत 117 नव्या रेल्वे सुरू करणार असल्याचेही ममता यांनी जाहीर केले. 1 हजार किलोमीटर रेल्वे लाईन्स 1 वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अंदमान-निकोबारमध्ये पहिली रेल्वे लाईन टाकणार तसेच रवींद्रनाथ टागोरांच्या 150व्या जयंतीनिमित्त 'भारततीर्थ' ट्रेन्स सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तर भारत-बांगलादेश रेल्वे सुरू करण्याचीही घोषणा त्यांनी केली. सुरक्षेला प्राधान्यरेल्वेच्या सुरक्षेसाठी आरपीएफची संख्या कमी पडत असल्याने ती वाढवण्याची घोषणा ममता यांनी केली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर त्यांनी विशेष भर दिला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला वाहिनी नावाच्या 12 बटालिटन तैनात करण्याची घोषणा ममता यांनी केली आहे. माजी सैनिकांना आरपीएफमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वच्छ आणि स्वस्त पाणीस्वच्छ आणि स्वस्त पाणी पुरवण्यासाठी रेल्वे 6 बॉटलिंग प्लॅन्ट सुरू करणार आहे. त्यातील एक प्लॅन्ट नाशिकमध्ये सुरू होणार आहे. रेल्वेला इको-फ्रेंडली करण्याचे ममता यांनी ठरवले आहे. सीएफएल बल्बचा वापर तसेच प्रायोगिक तत्वावर 10 इको फ्रेंडली डब्यांची निर्मिती करण्याची घोषणा त्यांनी केली.रेल्वे कर्मचार्‍यांना घरे येत्या 10 वर्षांत रेल्वेच्या 14 लाख कर्मचार्‍यांना घरे देण्याची महत्त्वाची घोषणा ममतांनी केली आहे. नगर विकास मंत्रालयासोबत पुढील 10 वर्षात ही योजना राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली, सिकंदराबाद, चेन्नई आणि मुंबई येथे रेल्वे स्पोर्टस ऍकॅडमी स्थापन करणार असल्याचे ममतांनी बजेट सादर करताना जाहीर केले. बजेटमधील इतर महत्त्वाच्या घोषणा- रेल्वेचे खाजगीकरण नाहीई-तिकीट जिल्हाधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचायतीत मिळणारई-तिकिटासाठी मोबाईल व्हॅनही सुरू करणारकॉमनवेल्थ गेम्ससाठी नवीन ट्रेन सोडणार ईशान्येकडील राज्यांसाठी मास्टर प्लानप्रत्येक क्रॉसिंगवर चौकीदार ठेवणारखेळाडूंना नोकर्‍या देणारहमालांसाठी आरोग्य विमामोठ्या स्टेशन्सवर शीतगृहे10 ऑटोमोबाईल हब उभारणाररेल्वे इको पार्क बनवणारईस्ट-वेस्ट कॉरिडॉरची योजनाहाय स्पीड पॅसेंजर कॉरिडॉररायबरेलीला कोच फॅक्टरी हावडामध्ये रवींद्र म्युझियमसिंगूरला रेल्वे कारखानागीतांजली म्युझियम उभारणारनॅशनल हाय स्पीड रेल्वे ऍथॉरिटीची स्थापनानव्या रेल्वेमार्गासाठी 4 हजार 411 कोटी रुपयांची तरतूदप्रवाशांच्या सुविधांसाठी 1 हजार 302 कोटी रूपयांचा निधीपश्चिम बंगालमध्ये डिझेल मल्टिपल फॅक्टरीची स्थापना करणाररेल्वेसाठी जमीन दिलेल्या कुटुंबातील एकाला नोकरीराष्ट्रीय स्वास्थ योजनेतून रेल्वे व्हेंडर आणि अधिकृत विक्रेत्यांना लाभरेल्वे कल्चरल बोर्ड स्थापणारदोन रेल्वे म्युझियम स्थापणार828 किमी रेल्वे मार्गावर अद्ययावत सुरक्षा व्यवस्थागरीब विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतअल्पसंख्यांक, महिलांना रेल्वे परीक्षा शुल्क नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2010 11:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2010 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close