S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटमध्ये दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Jan 9, 2016 01:50 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटमध्ये दाखल

09 जानेवारी : आठवडाभरापूर्वी दहशतवाद्यांकडून हल्ला चढवण्यात आलेल्या भारतीय वायूदलाच्या तळाला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी सध्या कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

यावेळी मोदी हवाई तळावरील लष्करी अधिकार्‍यांची भेट घेऊन या हल्ल्याबद्दलची माहिती घेतील आणि हवाई तळाची पाहणी करतील, असं सांगितलं जात आहे. पठाणकोट इथल्या वायुसेनेच्या तळावर सहा अतिरेक्यांनी मागील शनिवारी हल्ला चढवला होता. या दहशतवाद्यांचा खात्मा करताना भारतीय लष्कराचं सात जवान शहीद झाले होते.

दरम्यान, पठाणकोट हल्ल्यासंबंधित सर्व पुरावे भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत. हल्ल्याबाबत भारताने जी माहिती पुरवली आहे, तिच्या आधारे या हल्ल्याचा तपास करण्याचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2016 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close