S M L

आप सरकारच्या 'सम-विषम' प्रयोगाचा आज हायकोर्टात फैसला

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2016 12:41 PM IST

आप सरकारच्या 'सम-विषम' प्रयोगाचा आज हायकोर्टात फैसला

11 जानेवारी : दिल्लीमध्ये सम-विषम प्रयोगाबद्दल आज (सोमवारी) दिल्ली हायकोर्टात फैसला होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या या योजनेला आव्हान देणार्‍या अनेक याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी त्यावरच्या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

या निर्णयाचा दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या पातळीवर काय परिणाम झालाय. त्याचं विश्लेषण करण्यासाठी ही योजना आणखी एक आठवडा सुरू राहणार असल्याचं आप सरकारनं हायकोर्टात सांगितलंय. त्यापूर्वी ही योजना फक्त एक आठवडा सुरु ठेवण्याचं हायकोर्टाने सुचवलं होतं.

शनिवारी आणि रविवारी दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या घटल्याचं दिसून आलं, त्यामुळे आप सरकारला आता युक्तिवाद करायला बळ मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close