S M L

जशास तसं प्रत्युत्तर द्यायला लष्कर तयार- लष्कर प्रमुख

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2016 07:41 PM IST

जशास तसं प्रत्युत्तर द्यायला लष्कर तयार- लष्कर प्रमुख

13 जानेवारी : देशाची सुरक्षा ही भारतीय लष्कराची सर्वोच्च प्रेरणा असून, राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्याची भारतीय लष्कराची तयारी असल्याचा विश्वास लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दलबीरसिंग यांनी पठाणकोट हल्ल्याशी निगडीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

पठाणकोट ऑपरेशन लष्कराने योग्य पद्धतीने पार पाडलं. जीवीतहानी टाळण्याच्या उद्देशामुळे ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागला, असं दलबीर म्हणाले. पठाणकोट ऑपरेशन राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) हाती सोपोवण्याच्या निर्णयाचंही दलबीरसिंग यांनी समर्थन केलं. दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवल्याच्या घटनांना एनएसजीचे जवान उत्तम प्रकारे हाताळू शकतात. त्यामुळे हे ऑपरेशन एनएसजीच्या हाती सोपोवण्याच्या निर्णय योग्यच होता, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) पठाणकोट हल्ल्याचा तपास करत असून, काही पाकिस्तानी हत्यारे ताब्यात घेण्यात आली आहेत, तपास पूर्ण झाल्यानंतर एनआयएकडून आणखी स्पष्ट दिली जाणार असल्याचे दलबीरसिंग यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2016 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close