S M L

भारताला फार काळ विजय साजरा करू देणार नाही, मसूद अझरची दर्पोक्ती

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2016 12:27 PM IST

भारताला फार काळ विजय साजरा करू देणार नाही, मसूद अझरची दर्पोक्ती

14 जानेवारी : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्ताननं काल बुधवारी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरला अटक केली आहे. मात्र, तरीही त्याचा उद्दामपणा कमी झालेला नाही. जैश-ए-मोहम्मदच्या वेबसाईटवर मसूद अझहरचा लेख प्रसिद्ध झालाय. त्यामध्ये त्यानं 'माझ्या शत्रूंना मी फार काळ विजयोत्सव साजरा करू देणार नाही', अशी धमकी दिली आहे. त्याशिवाय मला अटक करून पाकिस्तान फार मोठी चूक करत आहे, असा इशाराही स्वत:च्या पोषणकर्त्यांना दिलाय.

अझर मसूदनं जेलमधून अल कलाम या आपल्या मुखपत्राला सैदी या नावाखाली हा लेख लिहिला असा दावा इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रसने केला आहे. जर देवाची इच्छा राहिली तर आमचं सैन्य हे शुत्रांना जास्त दिवस विजयोत्सव साजरा करू देणार नाही. माझ्या सैन्याला माझी उणिवा भासणार नाही. भारतात आमच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. त्यांच्या मागणीमुळे आमचं सरकार परेशान झालंय. बहुतेक आम्ही त्यांच्या मैत्रिपूर्ण संबंध आणि आलेल्या जवळकीत अडचण निर्माण केलीये अशी मुक्ताफळंही अझरने उधळली.

 मसूद अझहरची मुक्ताफळं

- अझर मसूदनं सैदी या टोपणनावानं लेख लिहिलाय

- पाकिस्तान सरकारनं जैश-ए-मोहम्मदविरोधात पत्करलेला मार्ग धोकादायक आहे

- मशिदी, मदरसे यांच्याविरोधात नवाज शरीफ सरकारची पावलं पाकिस्तानच्या ऐक्यासाठी धोकादायक आहेत

- पाकिस्तानचं सैन्य आमच्या शत्रूंना फार काळ विजयोत्सव साजरा करू देणार नाही ही अपेक्षा

- देवाचं सैन्य माझी गैरहजेरी फार काळ जाणवू देणार नाही

- आमच्याविरोधात भारतातून फारच तक्रारी केल्या जात आहेत

- पाकिस्तानी नेते आणि भारताबरोबरची जवळीक यामध्ये आम्ही व्यत्यय आणला म्हणून ते संतापले

- 'कयामत'च्या दिवशी पाकिस्तानच्या नेत्यांना स्वत:ला मोदी आणि वाजपेयींचे मित्र म्हणवून घ्यायचं आहे

कोण आहे मौलाना मसूद अझर?

- जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख

- 1999 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये तुरुंगात होता

- कंदहार विमान अपहरण प्रकरणी प्रवाशांच्या बदल्यात मसूदची सुटका

- 2000 मध्ये मसूदनं जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली

- 2001 मध्ये संसदेवरच्या हल्ल्यात जैशचा हात

- मसूद पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड

- अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन घातपातासाठी तयार करणं हे मुख्य काम

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close