S M L

मसूद अझर ताब्यात अटक नाहीच, पाकची धुळफेक

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2016 11:36 AM IST

masood_Azharनवी दिल्ली - 15 जानेवारी : पठाणकोट हल्ल्याप्रकरणी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझरला अटक झाल्याचं पाकिस्तानच्या सरकारनं नाकारलं आहे. पण पाकिस्तानतल्या पंजाबचे कायदामंत्री राणा सनाउल्लाह यांनी मात्र, मसूद अझरला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र, त्याला अटक झालेली नाही असंही त्यांनी पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय.

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंबंधी मौलाना मसूद अझरला पाकिस्तान सरकारनं ताब्यात घेतल्याची बातमी बुधवारी आली होती. त्यानंतर काल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्याला अटक झाल्याचं नाकारलं होतं. दरम्यान, या हल्ल्याच्या तपासासंबंधी अजूनही छापे सुरूच आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या उपसंघटनेतर्फे सियालकोटमध्ये चालवल्या जाणार्‍या धार्मिक शिक्षण देणार्‍या शाळांवर काल छापे टाकण्यात आले.

राणा सनाउल्लाह यांनी काय म्हटलंय ?

मसूद अझरला पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागानं प्रोटेक्टिव्ह कस्टडीमध्ये घेतलं आहे. पठाणकोट हल्ल्यासंबंधी आम्ही मसूद अझर आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, त्यांचा हल्ल्यामध्ये संबंध असल्याचं सिद्ध झाल्यानंतरच त्यांना अटक करण्यात येईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2016 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close