S M L

होळी आणि धूलिवंदन

1 फेब्रुवारीदेशात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सणाविषयी अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी भक्त प्रल्हादाची कथा प्रसिद्ध आहे. विष्णूभक्ती करणार्‍या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहिण धुंडा राक्षसीला सांगितले. अग्नीपासून इजा होणार नाही, असे तिला वरदान होते. त्यामुळे ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण प्रल्हादाला इजा झाली नाही. आणि दुष्ट धुंडा जळून गेली. त्यांची आठवण म्हणून होळी साजरी करण्यात येते. अशी पौराणिक कथा असली तरी, जुन्या, वाईट चालीरिती, अंधश्रद्धा, अपप्रवृत्ती यांना जाळून टाकावे. आणि नवीन विचारसरणी, बंधुभाव वाढवावा असा हा सण साजरा करण्यामागील उद्देश आहे. होळीच्या दुसर्‍या दिवशी देशभर धूलिवंदन साजरे होते. सकाळीच महिला घरातील पाण्याचे हंडे, तपेली, घागरी होळी पेटवलेल्या ठिकाणी ठेवतात. उन्हाने तापलेल्या या पाण्याने मग लहान मुलांना अंघोळ घातली जाते. यामुळे मुलांना उन्हाळा बाधत नाही असाही समज आहे. हे कैर्‍यांचेही दिवस असतात. त्यामुळे कैर्‍या उकडून त्याचा गर मुलांच्या अंगाला लावून अंघोळ घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून होळीची राख कपाळाला लावतात, नंतर राख अंगाला फासून स्नान करतात. ही झाली धूलिवंदनाची परंपरा. पण हा सण म्हणजे वसंत ऋतूच्या स्वागताचा सण. निसर्गप्रेम, बंधुभावाचा संदेश देणारा सण. उत्तर प्रदेशात भगवान श्रीकृष्णाच्या मथुरेत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2010 10:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close