S M L

दुष्काळग्रस्तांना मोफत धान्य द्या- सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Jan 19, 2016 12:44 PM IST

03TH_SUPREME_COURT_1319497f

18 जानेवारी : दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं राज्य आणि केंद्र सरकारला फटकारलं आहे. देशातील दुष्काळग्रस्तांना मोफत धान्य देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज (सोमवारी) केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना दिलं. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त घरातील एका व्यक्तीस 'मनरेगा' अंतर्गत किमान 150 दिवस काम देण्यात यावे, असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

केंद्र सरकार अन्न सुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी करण्याबाबत गंभीर नाही असे ताशेरेही सुप्रीम कोर्टानं ओढलेत. स्वराज अभियानाच्या वतीनं दाखल करण्यात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. सर्व दुष्काळग्रस्त राज्यांच्या कृषी सचिवांची बैठक बोलावण्यात यावेत असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं केंद्राला दिलेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2016 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close