S M L

थरूर यांची ट्विट ट्विट...

2 फेब्रुवारीसौदी अरेबियाची भूमिका भारत आणि पाकिस्तानच्या चर्चेत महत्त्वाची ठरेल, असे परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांनी म्हटले. आणि लगेगच यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले. सौदी अरेबियाचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे पाकिस्तानला दहशतवादावर चर्चा करण्यासाठी सौदी अरेबिया भाग पाडू शकते, असा आपल्या म्हणण्याचा अर्थ होता, असं थरुर यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात तरूणतुर्क थरूर यांची ही सगळी वादग्रस्त 'ट्विट ट्विट' ट्विटर या सोशल नेटवर्क साईटवरून सुरू आहे.'कॅटल क्लास'चा वाद'मी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करतोय आणि आम्हाला गुरा-ढोरांसारखं घेऊन जातायत असं वाटतंय...' श्असे वादग्रस्त विधान थरूर यांनी ट्विटरवरूनच केले होते.त्यावर मग ट्विटरवर थरूर यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधातील कॉमेंट्सचा ओघच सुरु झाला. आज शशी थरुर हे अमेरिका वगळता जगातले एकमेव राजकीय नेते आहेत ज्यांना ट्विटर अधिकृतपणे प्रमोटच करत आहे. डॉक्टर शशी थरुर यांचे ओएसडी जेकब जोसेफ तर थेट सांगतात की आम्ही ट्विटरशी संलग्न आहोत. प्रशासनातील कामकाजाला गती देण्यासाठी ट्विटरचा वापर कसा करुन घेता येईल यावर आता काम सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.भविष्यातील सर्च टूलजर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर पुणेकरांची एकजूट, आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स खेळणारच, ललित मोदींचा निर्धार, शाहरुख खानची शिवसेनेवर टीका... हल्ली या ब्रेकिंग न्यूज ब्रेक होतात त्या ट्विटरवर...इंडोनेशियावर झालेले बॉम्बहल्ले, चीनमधला भूकंप, इराणमधली निदर्शनं या सगळ्या बातम्या न्यूज चॅनेल्सनी फ्लॅश व्हायच्या कितीतरी आधीच ट्विटरवर अवतीर्ण झाल्या होत्या. भविष्यातल्या या अशा घडामोडींवर नजर ठेवणारी कंपनी म्हणजे गार्टनर. गार्टनरच्या मते, पुढच्या दोन वर्षात जगातल्या अर्ध्यहून जास्त कंपन्या आपला बिझनेस वाढवण्यासाठी ट्विटरसारख्या वेबसाईट्सचा वापर करतील. ई-मेलपेक्षा या वेबसाईटचा वापर संपर्कासाठी केला जाईल.आणखी एक कंपनी, एसी नेल्सनच्या मते, नव्याने ट्विटरवर येणारे 60 % नेटिझन्स एक महिन्यानंतर प्रतिसाद देत नाहीत. त्यांचा असाही दावा आहे की, तरुणांपेक्षा प्रौढ नेटिझन्समध्ये ट्विटरची लोकप्रियता जास्त आहे. म्हणजे एकीकडे, बिझनेस वाढवण्यासाठी ट्विटरचा वापर केला जात आहे. सोशल वर्क शंभरपेक्षा जास्त अनोळखी, एका विकेंडला एकत्र जमलेत... गरीब, अनाथ मुलांच्या मदतीसाठी देणगी जमवायला...यांना एकत्र आणण्यासाठी कुठल्या मोहिमेची किंवा संघटनेची गरज लागली नाही... त्यांना एकत्र आणले ट्विटरनं...देशातल्या सहा राज्यांमध्ये अशाप्रकारे ट्विटरच्या माध्यमातून मोहीम राबवली जाते.ट्विटरवरच्या मेसेजमधून एकमेकांना मोहिमेची माहिती मिळते. त्यातून सगळेजण एकत्र येतात, एखाद्याचा प्रश्न अगदी चटकन सुटतो. इंटरनेटच्या ह्या ऑनलाईन चॅटिंगचा असाही फायदा होतो. ही या सगळ्यांमागची एक वेगळी बाजू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2010 03:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2010 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close