S M L

नेताजींच्या मृत्युबाबतचं गुढ उकलणार का?, पंतप्रधानांच्या हस्ते 100 फाईल्स सार्वजनिक

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2016 02:33 PM IST

नेताजींच्या मृत्युबाबतचं गुढ उकलणार का?, पंतप्रधानांच्या हस्ते 100 फाईल्स सार्वजनिक

नवी दिल्ली - 23 जानेवारी : आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. आणि आजच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 100 गुप्त फाईल्स केंद्र सरकारने उघड केल्या आहे. दिल्लीत नेताजींच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत या फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या फाईल्सच्या डिजीटल कॉपीज सार्वजनिक करण्यात आल्या.

सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 64 फाईल्स पश्चिम बंगाल सरकारने सप्टेंबर 2015मध्ये उघड केल्या होत्या. भारतीय पुरातत्व विभागातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 25 फाईल्सच्या डिजिटल कॉपीज प्रत्येक महिन्याला सार्वजनिक करण्याची योजना बनवली गेलीय. त्यामुळे आतातरी नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडेल का असा सवाल विचारला जातोय. संसदेतही नेताजींना आदरांजली वाहण्यात आली. नेताजींचं कुटंुबीय आज संसदेत उपस्थित आहेत.

नेेताजीं सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत 100 गुप्त फाईल्स केंद्र सरकार उघड करतंय. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी ट्विट केलंय.

मोदी म्हणतात की," आजचा दिवस भारतीयांसाठी खास आहे. नेताजींच्या जयंतीनिमित्त आपण सगळेच त्यांचं स्मरण करूया. नेतोजींची राष्ट्रभक्तीमुळं ते भारतीयांच्या मनामनात आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2016 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close