S M L

भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा अमित शाह

Samruddha Bhambure | Updated On: Jan 24, 2016 02:00 PM IST

भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा अमित शाह

नवी दिल्ली – 24 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शाह यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात आज शाह यांची पक्षाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज दुपारी पक्षाच्या मुख्यालयात निडणूक पार पडली. पक्षाध्यक्षपदासाठी अमित शाह यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, त्यांच्या विरोधात कुणाचाही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. पुढील तीन वर्षांसाठी शाह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यानंतर गृहमंत्री झालेले राजनाथ सिंह यांचे उत्तराधिकारी म्हणून शहा यांनी अध्यक्षपदाचा दीड वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. सत्तेत आल्यानंतरच्या 6 महिन्यांत भाजपने मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड तसंच जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता मिळविली, पण गेल्या वर्षारंभी दिल्ली विधानसभा निवडणुकीत तसेच वर्षाअखेर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अमित शाह यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अमिच शाह यांची पुन्हा एकदा पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2016 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close