S M L

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांचं भारतात आगमन

Samruddha Bhambure | Updated On: Jan 24, 2016 03:34 PM IST

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांचं भारतात आगमन

चंदिगड- 24 जानेवारी : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद आजपासून भारताच्या दौर्‍यावर आहेत. फ्रांस्वा ओलांद हे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणार्‍या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

ओलांद यांच्या भारत दौर्‍याची सुरुवात चंदिगडपासून झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ते चंदिगडमधल्या 4 प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान हा चर्चेचा अनौपचारिक कार्यक्रम असेल. संध्याकाळी 6 वाजता ते चंदीगडमधून दिल्लीसाठी रवाना होतील.

या दौर्‍यात मोदी आणि ओलांद यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून दहशतवाद, जलवायू परिवर्तन, स्मार्ट सिटी, अणुऊर्जा यासारख्या काही मुद्द्यांचा समावेश असेल. तसंच ओलांद हे भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या राष्ट्रीय संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणूनही उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणारे ओलांद हे पाचवे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी होणार्‍या संचलनामध्ये भारतीय लष्कराबरोबर फ्रेंच सैन्यामधील सैनिकांची तुकडीही सहभागी होणार आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांच्या भारत दौर्‍यानिमित्त चंडीगडमध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2016 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close