S M L

आता गॅस सिलेंडरचे पैसे भरा ऑनलाईन

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2016 01:43 PM IST

 LPG gas sucidy

नवी दिल्ली - 25 जानेवारी : ऑनलाईन खरेदीचा साईस्कर मार्ग आता भारतीय गॅस कंपन्यांना वापरला आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरचे पैसे आता ऑनलाईन भरता येणार आहेत. ऑनलाईन बुकिंग करतानाच पैसे भरण्याची सुविधा सुरू करण्यात आलीये. त्यामुळं अनेकदा घरात पैसे नाहीत किंवा सुटे पैसे नाहीत म्हणून होणारा त्रास टळणार आहे.

नोव्हेंबर 2015 मध्ये देशातल्या काही भागात ही सुविधा सुरू करण्यात आली होता. आता ती संपूर्ण देशात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एलपीजी पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि इमेल आयडी देऊन खातं उघडावं लागेल. इथं लॉग इन केल्यानंतर रिफिल बुकिंगमध्ये बुक करताना ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन मिळेल. पण यासाठी बँकांचा चार्ज आणि सेवा कर असा ग्राहकांना 8-10 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2016 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close