S M L

धीरुभाई अंबानी, रजनीकांत,अजय, प्रियांका आणि उज्ज्वल निकमांना पद्म पुरस्कार

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2016 08:20 PM IST

धीरुभाई अंबानी, रजनीकांत,अजय, प्रियांका आणि उज्ज्वल निकमांना पद्म पुरस्कार

नवी दिल्ली - 25 जानेवारी : देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणार्‍या पद्म पुरस्कारांची आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली. मात्र, यंदा कुणालाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला नाही. रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय.

आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, रामोजीराव, गिरीजादेवी,यामिनी कृष्णमूर्ती आणि वासुदेव कालकुंटे यांचाही पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

तसंच बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजमोहली, अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना पद्मश्री जाहीर झालाय. तसंच प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झालाय. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण यांना पद्मभूषण जाहीर झालाय. विशेष म्हणजे यावेळी एकाही राजकीय नेत्याला पुरस्कार जाहीर झालेला नाही.

पद्मविभूषण

धीरुभाई अंबानी ( मरणोत्तर ) - पद्मविभूषण

यामिनी कृष्णमूर्ती - पद्मविभूषण

रजनीकांत - पद्मविभूषण

रामोजीराव - पद्मविभूषण

गिरीजादेवी - पद्मविभूषण

श्रीश्री रविशंकर - पद्मविभूषण

श्री जगमोहन - पद्मविभूषण

वासुदेव कालकुंटे -पद्मविभूषण

पद्मभूषण

सानिया मिर्झा - पद्मभूषण

उदित नारायण - पद्मभूषण

अनुपम खेर - पद्मभूषण

विनोद राय - पद्मभूषण

राम सुतार - पद्मभूषण

सायना नेहवाल - पद्मभूषण

 

पद्मश्री

एसएस राजमोहली - पद्मश्री

अजय देवगण - पद्मश्री

प्रियांका चोप्रा -पद्मश्री

मधुर भांडारकर - पद्मश्री

(सविस्तर बातमी लवकरच)

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2016 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close