S M L

अजूनही धागेदोरे नाहीत

3 फेब्रुवारीपुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटला आता 18 दिवस झाले आहेत. पण अजूनही पोलिसांनी याबाबत काहीही धागेदोरे मिळालेले नाहीत. त्यामुळे या तपासात एटीएस तसेच पुणे पोलिसांचे तपासातील अपयश समोर येऊ लागले आहे.जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारीला हा बॉम्ब स्फोट झाला. या बॉम्बस्फोटाने केवळ पुणेच नव्हे, तर आख्खा देश हादरला होता. देशाचे गृहमंत्री , राज्याचे मुख्यमंत्री सगळेच तात्काळ पुण्यात धावले होते. या स्फोटानं 17 बळी घेतलेत, पण गेल्या 18 दिवसात काडी ए़वढीही माहिती तपास यंत्रणेला मिळालेली नाही.संशयावरून पोलिसांनी अनेकांना ताब्यातही घेतले होते. पण त्यांच्याकडूनही काहीही माहिती मिळत नसल्याचेच दिसत आहे. एटीएसची तीन आणि पुणे पोलिसांची तीन अशी सहा पथके पुण्यात कामाला लागलीत. एनआयए ,आयबी, सीबीआयचे अधिकारीही तपास करत आहेत. मात्र त्यांच्याही हाती काही लागलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2010 10:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2010 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close