S M L

भारतावर विश्वास कसा ठेवायचा?

4 फेब्रुवारीज्या देशातली सुरक्षायंत्रणा दोन पंतप्रधानांना वाचवू शकली नाही, त्या देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा? असा बोचरा सवाल प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी केला आहे. कतारचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर हुसेन यांनी CNN -IBN ला खास मुलाखत दिली. राजकारण्यांनी कलेचा आणि संस्कृतीचा मान कसा राखायचा हे शिकायला हवे, अशी कडवट टीकाही त्यांनी केली आहे.संस्कृती राहते अभंगराजकारण हे टाकाऊ आहे, अशातला भाग नाही. देश चालवण्यासाठी राजकारण गरजेचे आहे. पण संस्कृती म्हणजे काय, हे राजकारण्यांना माहीत हवे. कारण, संस्कृतीमधूनच देशाची ओळख बनते. अर्थकारण आणि राजकीय शक्ती कायमस्वरुपी नसतात, हे इतिहासात सिद्ध झाले आहे. सर्व मोठ्या नागरी वसाहती नष्ट झाल्या. पण संस्कृती मात्र टिकून राहिली. कलेचे जे अवशेष मिळाले, त्यातून प्राचीन काळातले लोक कसे राहत होते, कसे वागत होते, हे दिसून येतं. त्यातून तुम्हाला त्या काळातली संस्कृती समजते, असे हुसेन यांनी म्हटले आहे. 26 वर्षांनी 8 गुन्हे 1996 साली हुसेननं चितारलेली हिंदू देवतांची नग्न चित्रे एका मॅगझिनमध्ये छापून आली आणि वादळ उठले. हुसेनने ही सगळी चित्रे 1970 सालीच चितारली होती. पण त्यावर लेख छापून आला आणि 26 वर्षांनी 8 गुन्हे दाखल झाले. हल्ले आणि निदर्शने1998 मध्ये बजरंग दलाने हुसेन यांच्या घरावर हल्ला केला. शिवसेनेने या हल्ल्याचे समर्थन केले. 2006 साली पुन्हा एकदा निदर्शनांना सुरुवात झाली. 'भारतमाता' या कलाकृतीमुळे हुसेनला जिवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या.हिंदू पर्सनल लॉ बोर्ड या संघटनेने हुसेन यांना ताब्यात देणार्‍याला 51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.मध्यप्रदेशमधील माजी काँग्रेस नेते अब्दुल बेग यांनी, जो हुसेनचे हात छाटेल त्याला 20 हजार युरोचे बक्षीस जाहीर केले.प्रदर्शनाला केले लक्ष्य2007मध्ये दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमधील हुसेनच्या चित्र प्रदर्शनाला लक्ष्य केले गेले. 2008 मध्ये तर हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळे इंडिया आर्ट समिटच्या आयोजकांनीच हुसेन यांची पेंटिंग्ज न ठेवण्याचा निर्णय घेतला.गाण्यावरुनही गहजब हुसेनच्या मीनाक्षी या सिनेमातील 'नूर उन्नला नूर' या गाण्यावरुनसुध्दा गहजब उडाला. प्रेषित महंमद यांची महती सांगणारे शब्द या गाण्यात सुंदर तरुणीच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आले होते. यावरच ऑल इंडिया उलेमा कौन्सिलने आक्षेप घेत तक्रार दाखल केली. 2006 मध्ये सोडला देशमार्च 2006 मध्ये अखेर हुसेन यांनी देश सोडला. गेल्या चार वर्षांपासून ते कधी दुबई तर कधी लंडन असा आसरा घेत होते. अखेर आता त्यांनी कतारचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2010 04:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2010 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close