S M L

नवसारी एसटी बस अपघातात 42 प्रवाशांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 01:36 PM IST

नवसारी एसटी बस अपघातात 42 प्रवाशांचा मृत्यू

गुजरात - 05 फेब्रुवारी : गुजरातमध्ये नवसारी-बारडोलीजवळ एसटी बसला भीषण अपघातात मृतांचा आकडा 42 वर पोहचलाय . बस नदीत कोसळून 42 प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर 37 जण जखमी आहेत. नवापूर- नवसारी रोडवरची ही घटना आहे. मृतांमध्ये नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या 6 जणांचा समावेश आहे.

नवसारी सुपागावजवळ हा अपघात घडलाय. ही बस नवसारीहून बारडोलीकडे जात होती. सुपा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरून जाताना समोरून येणार्‍या वाहनास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि 20 फूट उंचीवरून बस नदीत कोसळली. जखमींवर बारडोली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या बसमध्ये 60 प्रवाशी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close