S M L

लाठीमाराच्या चौकशीचे आदेश

6 फेब्रुवारीवसई-विरार भागात काल झालेल्या लाठीचार्जची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत.आठवड्यात अहवाल द्याकोकण रेंजचे आयजी परमबीर सिंह यांना ही चौकशी करण्याचे आदेश आर. आर. यांनी दिले. या बाबतचा अहवाल परमबीर यांना एका आठवड्यात द्यावा लागणार आहे. हा लाठीमाराचा प्रकार निश्चितच गंभीर होता, अशी कबुलीही आर. आर. यांनी दिली आहे. या लाठीमाराची दृश्ये आणि फोटो आपण पाहिले आहेत. अशा पद्धतीने लाठीमार करणे गरजेचे होते का? लाठीमाराचे आदेश कोणी दिले? हा लाठीमार टाळता आला असता का? याबाबतची माहिती आपण घेत आहोत, असेही आर. आर. यांनी म्हटले आहे.वसई महापालिका क्षेत्रातून 53 गावे वगळणाच्या मागणीसाठीचे आंदोलन दडपण्याच्या निमित्ताने काल पोलिसांनी जोरदार लाठीमार केला होता. यात पोलिसांनी अगदी घराघरांत घुसून लाठीमार केला. त्यात आंदोलकांव्यतिरिक्त इतर नागरिक, महिला आणि मुलांवरही लाठीमार झाला आहे. महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक पोलिसांनी जनआंदोलन समितीच्या काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या कार्यकर्त्यांवर गुन्हा नसतानाही अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलेले नसतानाही त्यांच्यावर सार्वजनिक नुकसान केल्याची कलमे लावली आहेत, असा आरोप विवेक पंडित यांनी केला आहे. प्रफुल्ल ठाकूर, विलास बसवंत, हिरामण हरवटे आणि संतोष किणी या चार आंदोलकांना आज वसई कोर्टात हजर करण्यात आले.पोलिसांवर गंभीर आरोप आमदार विवेक पंडित यांनी कालच्या आंदोलनानंतर आज पोलिसांना दिलेल्या जबाबात डीवायएसपी दीपक देवराज आणि पोलीस निरीक्षक नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवराज आणि नाईक यांनी बेछूट लाठीमार करून महिलांना नग्न करण्याचे तसंच मोबाईल आणि दागिने लुटण्याचं सत्र सुरू केले होते, असे पंडित यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे. त्यासोबतच आपल्या दोन्हीही गाड्या देवराज यांनी स्वत: लाठ्यांनी फोडल्या असा आरोप त्यांनी केला आहे. मनसेचीही उडीमनसेनेही आता या आंदोलनात उडी घेतली आहे. महापालिका क्षेत्रातून 53 गावे वगळावीत यासाठी वसई जनआंदोलन समितीने केलेल्या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सामील झाले होते. मनसेचे वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनाही अटक करण्यात आली आहे. मनसे पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आमदार विवेक पंडित यांच्या पाठीशी उभी आहे, अशी प्रतिक्रिया देत मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी वसई जनआंदोलन समितीला पाठिंबा दर्शवला. काल झालेल्या अमानुष लाठीमारानंतर नांदगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच आमदार विवेक पंडित यांची भेट घेऊन विचारपूसही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2010 12:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2010 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close