S M L

वीरजवान हणमंथप्पांची प्रकृती चिंताजनक, पुढेच 24 तास महत्त्वाचे

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2016 01:05 PM IST

SiachenMiracle (1)नवी दिल्ली - 11 फेब्रुवारी : सियाचीनमधून हिमस्खलनात बचावलेले लान्स नाईक हणमंथप्पा यांची मृत्यूशी दुसरी झुंज सुरू आहे. आज त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. 3 दिवसांपूर्वी त्यांची बर्फाच्या ढिगार्‍याखालून सुटका करण्यात आली होती. ते अजूनही कोमात आहेत आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.

हणमंथप्पा यांना न्युमोनिया झालाय आणि दोन्ही फुफ्फ्सुसांमध्ये इन्फेक्शन झालंय. त्यांचं यकृत आणि एक किडनी निकामी झाल्याची माहिती आर्मीच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलीये. न्युमोनियामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये. पुढचे 24 तास त्यांच्या प्रकृतीसाठी महत्त्वाचे असल्याचं आर्मी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी म्हटलंय. लान्स नाईक हनुमंथप्पा यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

हनुमंथप्पांच्या गावी शोकाकूल वातावरण

सियाचीनमध्ये सेवा बजावताना बर्फाखाली गाड़ले जावून पण बचावलेल्या हणमंथप्पा यांच्या बेटदूर या मुळगावी सध्या शोकाकुल वातावरण आहे. गावचे नागरिक हणमंथप्पा यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. हुबळीतल्या अनेक शाळांमध्ये हणमंतप्पा यांच्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली.

नाशिकमध्ये महाआरती

तर जवान हणमंथप्पांसाठी नाशिकच्या रामकुंडावर महाआरती झाली. पुरोहित महासंघ प्रमुख सतीश शुक्लं, कीर्तनकार पं. श्रीपादजी यावेळी सहभागी होते. महाआरती करून जवान हणमंथप्पा बरे होण्यासाठी देवाकडे नाशिकरांनी साकडं घातलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close