S M L

काय आहे इशरत जहाँ प्रकरण ?

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2016 12:53 PM IST

 ishrat jhan11 फेब्रुवारी : इशरत जहाँ अतिरेकी होती की नव्हती ? या प्रश्नाभोवती गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. आज पाकिस्तानचा दहशतवादी डेव्हिड हेडलीने इशरत जहाँ लष्कर ए तोयबाची हस्तक होती. आणि इशरत ही सुसाईड बॉम्बर होती असा खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

15 जून 2004 ला अहमदाबाद-गांधीनगर रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी गुजरात पोलिसांनी केलेल्या चकमकीत 19 वर्षांची इशरत आणि तिच्याबरोबर असलेल्या 3 तरुणांना ठार मारण्यात आलं होतं. इशरत ही लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेची सदस्य होती असा दावा पोलिसांनी केला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची हत्या करण्यासाठी तिला पाठवण्यात आल्याच्या संशयावरून ही चकमक करण्यात आली होती. या चकमकीत इशरतबरोबर तिचा साथीदार जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्ले हाही ठार झाला होता.

पण, सर्वात आधी गुजरातच्या मेट्रोपोलिटन कोर्टाने ही चकमक बनावट असल्याचा निकाल दिला. त्यानंतर गुजरात हायकोर्टाच्या आदेशावरून आधी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी आणि त्यानंतर सीबीआयाने या प्रकरणी तपास केला. इशरत आणि लष्कर-ए-तोयबाचा काहीही संबंध या दोन्ही तपास संस्थाना आढळला नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी स्थापन करण्यात आली. या समितीनेही इशरत निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला होता.

-15 जून 2004 रोजी अहमदाबादजवळ चकमकीत इशरत जहाँचा मृत्यू

- या चकमकीत एकूण चौघांचा मृत्यू

- इशरतबरोबर तिचा साथीदार जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्ले हाही ठार

- ठार झालेले इतर दोघं पाकिस्तानी नागरिक

- चकमकीच्या वेळी इशरत जहाँ महाविद्यालयात शिकत होती

- ही चकमक बनावट असल्याचा आरोप

- त्यानंतर न्यायलयीन चौकशीचे आदेश

- चौकशीअंती चकमक बनावट असल्याचा अहवाल

या प्रकरणातील कायदेशीर घडामोडी

- 15 जून 2004 ला अहमदाबादजवळ इशरत जहाँ आणि इतर तिघांचं एन्काऊंटर

- हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी होते, अहमदाबाद पोलिसांचा दावा

- नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा त्यांचा डाव होता, असा अहमदाबाद पोलिसांचा दावा

सप्टेंबर 2009 - ला एन्काऊंटर बनावट असल्याचा अहमदाबाद महानगर न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्णय

ऑगस्ट 2010 - सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या SIT नं तपास करावा, गुजरात हायकोर्टाचे आदेश

सप्टेंबर 2010 - SIT चे प्रमुख आर. के. राघवन यांनी तपास करायला असमर्थता दाखवली

सप्टेंबर 2010 -गुजरात हायकोर्टाने नव्या SIT ची स्थापना केली

नोव्हेंबर 2010 - SIT च्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

डिसेंबर 2010 - तीन सदस्यांच्या SIT नं तपास सुरू केला

28 जानेवारी 2011 - एन्काऊंटर बनावट असल्याचं प्रतिज्ञापत्र SIT चे सदस्य सतीश वर्मा यांनी दाखल केलं इतर सदस्य तपास निष्पक्षपातीपणे करत नसल्याचा आरोप

8 एप्रिल 2011 - हा तपास सीबीआय किंवा NIA कडे देण्याचा हायकोर्टाचा इशारा

18 नाव्हेंबर 2011 - SIT नं अहवाल कोर्टात सादर केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close