S M L

वीरजवानाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हुबळीत लोटला जनसागर

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2016 02:18 PM IST

वीरजवानाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हुबळीत लोटला जनसागर

hanmunthapa_hubliकर्नाटक - 12 फेब्रुवारी : भारतमातेचा सुपुत्र हणमंथप्पा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुवारी त्यांचं पार्थिव मुळ गावी हुबळी इथं दाखल झालं. कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. आज

सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 10 जवान बर्फाच्या ढिगाखाली गाडले गेले होते. पंरतु, हणमंथप्पा या ढिगाखाली चमत्कारीकरित्या बचावले होते. 6 दिवस बर्फाखाली मृत्यूशी झुंज देऊन ते सुखरूप बचावले होते. पण, 6 दिवस बर्फाखाली राहिल्यामुळे त्यांना न्युमोनिया आणि फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. त्यांना दिल्लीतली रिसर्च अँड रेफरल आर्मी हॉस्पिस्पटलमध्ये उपचार सुरू होते. तीन दिवस मृत्यूशी दुसरी झुंज अपयशी ठरली. गुरुवारी सकाळी 11. 45 मिनिटानं हणमंथप्पा यांचं निधन झालं. काल संध्याकाळी त्यांचं पार्थिव दिल्लीत ब्रार स्कवेअरमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे तिन्ही दलांच्या प्रमुखांनी या वीर जवानाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मुळगावी हुबळीमध्ये आणण्यात आलं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हनुमंतप्पा यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2016 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close