S M L

होय, इशरतच्या टार्गेटवर मोदी,बाळासाहेब होते, राजेंद्र कुमारांचा दुजोरा

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2016 02:05 PM IST

होय, इशरतच्या टार्गेटवर मोदी,बाळासाहेब होते, राजेंद्र कुमारांचा दुजोरा

नवी दिल्ली - 13 फेब्रुवारी : इशरत जहाँ ही आत्मघातकी पथकाची सदस्य होती असा दावा डेव्हिड हेडलीनं नुकताच केला. त्याला गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनी दुजोरा दिलाय. एवढंच नाही, पण इशरतच्या पथकाचं टार्गेट 5 बडे नेते होते. त्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, प्रवीण तोगडिया आणि अशोक सिंघल यांचा समावेश होता असा दावा राजेंद्र कुमार यांनी केलाय.

भाजपच्या प्रचार रॅलींमध्ये दहशतवादी या नेत्यांवर हल्ला करणार होते, असा गुप्तचर विभागाचा कयास होता. राजेंद्र कुमार यांच्या वक्तव्याला यासाठी महत्त्व आहे. कारण यूपीए सरकारनं इशरत प्रकरणात ठोस माहिती आणि पुरावे नाहीत, असं कोर्टाला सांगितलं होतं, आणि त्यामुळे स्वतः राजेंद्र कुमार अडचणीत आले होते. इशरत जहाँ एन्काऊंटर हे राजेंद्र कुमार यांच्या सांगण्यावरुनच करण्यात आलं होतं. जेव्हा इशरत जहाँ चकमक बनावट असल्याचा चौकशी समितीने दावा केला होता त्यावेळी राजेंद्र कुमार यांनाही आरोपीच्या कटघर्‍यात उभं केलं गेलं होतं. हेडलीच्या साक्षीमुळे आता राजेंद्र कुमार यांनी आपली कारवाई योग्य होती असं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2016 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close