S M L

जेएनयू आंदोलनात राहुल गांधी पोहचले,अभाविपने दाखवले काळे झेंडे

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2016 10:09 PM IST

जेएनयू आंदोलनात राहुल गांधी पोहचले,अभाविपने दाखवले काळे झेंडे

नवी दिल्ली - 13 फेब्रुवारी : दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता राजकारण तापू लागलंय. आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणखी काही काँग्रेस नेत्यांसोबत जेएनयूमध्ये पोहचले. तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.तसंच राहुल गांधी यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्नही केला.

जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्या अटकेनंतर जेएनयूमध्ये दोन विद्यार्थी संघटनांदरम्यान प्रचंड गदारोळ सुरू आहे. अफजल गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ मंगळवारी जेएनयूमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला होता, यामध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा या विद्यार्थ्यांवर आरोप आहे आणि त्याचप्रकरणात कन्हैया कुमारला अटक झालेली आहे. या अटकेच्या विरोधात मोठं आंदोलन जेएनयूमध्ये सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी इथं आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इथं राहुल गांधींना अभाविपच्या विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाही दिल्या. राहुल गांधींनी विद्यार्थ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. राहुल गांधींचं भाषण झाल्यानंतर जेव्हा जे निघाले, तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आडवं पडून गाड्या रोखण्याचाही प्रयत्न अभाविपने केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2016 10:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close