S M L

मालवाहतूक कॉरिडॉरसाठी जमीन देण्यास नकार

अलका धुपकर, मुंबईसंपूर्ण देशाला पूर्व आणि पश्चिम रेल्वे लाईनवर जोडणारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजेच मालवाहतुकीचे स्वतंत्र ट्रॅक करण्याचा 46 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला आहे. यातील पश्चिम लाईनवरचा ट्रॅक दिल्ली ते जेएनपीटी असा असणार आहे. 1 हजार 483 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी महाराष्ट्रातील 120 गावांची जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन द्यायला शेतकर्‍यांचा विरोध नाही. पण योग्य मोबदला मिळत नसल्याने गावकर्‍यांनी भूसंपादनाला नकार दिला आहे. दिल्ली जेएनपीटी मार्गावर सध्या पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी एकाच ट्रॅकवर धावतात. त्यामुळे मालगाडीचा वेग ताशी फक्त 23 किलोमीटर एवढा आहे. हा वेग ताशी 100 किलोमीटर करण्यासाठी रेल्वेमंत्रालयाने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची योजना हाती घेतली आहे. यासाठी महाराष्ट्रातून 565 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाईल. यातील 120 पैकी 30 गावे रेल्वेने सक्तीने संपादितही केली. पण 90 गावांनी याविरोधात लढा पुकारला आहे.डोंबिवलीतील निळजे गावची इकॉनॉमी ही भाजीपाला, भातशेती आणि वीटभट्‌ट्यांवर अवलंबून आहे. या गावातील शेती आता प्रकल्पात जाणार आहे.प्रकल्पात गावातील 460 घरे जमीनदोस्त होणार आहेत. घरे आणि शेतीच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत, पण ते सरकारी दराने. या फ्रेट कॉरिडॉरचा मार्ग बदलावा आणि योग्य मोबदला मिळेपर्यंत भूसंपादनाला स्थगिती द्यावी, या मागण्यांसाठी मुंबई हायकोर्टात रायगडमधून दोन जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2010 10:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close