S M L

पुण्यात अंध कर्मचार्‍यांचे उपोषण

9 फेब्रुवारीपुण्यातील भोसरी येथे असलेल्या उमा प्रेसीजन्स लिमिटेड कंपनीतले 150 पेक्षा अधिक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. यामध्ये अंध महिला आणि पुरुष कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पण अजूनही या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. उपोषणाला बसलेल्या या सर्व कर्मचार्‍यांना त्वरीत कामावर घेण्याचे आदेश कोर्टाने याआधीच दिले होते. त्यानुसार कंपनीने आम्हाला कामावर घेतले. पण आमच्यावर अत्याचार करून आम्हाला कंपनीने विनाकारण निलंबित केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. तर या कर्मचार्‍यांचे निलंबन कोर्टाच्या आदेशाचाच एक भाग असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हे सर्व कर्मचारी महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनेचे कार्यकर्ते आहेत. आपल्या समस्या सोडवाव्यात म्हणून पुणे ते मुंबई पायी प्रवास करुन त्यांनी राज ठाकरेंनाही विनंती केली होती. पण त्यांनीही अजून यामध्ये लक्ष दिलेले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2010 10:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2010 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close