S M L

जेएनयू घोषणाबाजी प्रकरणाच्या एनआयए चौकशीस दिल्ली हायकोर्टाचा नकार

Samruddha Bhambure | Updated On: Feb 16, 2016 03:36 PM IST

जेएनयू घोषणाबाजी प्रकरणाच्या एनआयए चौकशीस दिल्ली हायकोर्टाचा नकार

दिल्ली - 16 फेब्रुवारी : जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी हस्तक्षेप करण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला आहे. आम्ही काय उतावीळ राजकीय नेते आहोत का? असे ताशेरे ओढत या प्रकरणी एनआयएद्वारे चौकशीची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

दिल्ली पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि घटनेच्या मुळाशी जावं. ही घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे एवढ्या लवकर अशा याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. तसंच या प्रकरणाची दिल्ली पोलीस चौकशी करण्यास सक्षम असल्याचा विश्वासही दिल्ली हायकोर्टाने व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2016 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close