S M L

दिल्लीत पत्रकारांना मारहाणीच्या निषेधार्थ पत्रकारांचा मोर्चा

Sachin Salve | Updated On: Feb 16, 2016 10:53 PM IST

दिल्लीत पत्रकारांना मारहाणीच्या निषेधार्थ पत्रकारांचा मोर्चा

नवी दिल्ली - 16 फेब्रुवारी : जेएनयू प्रकरणी पटियाला कोर्टाच्या परिसरात पत्रकारांना मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून जवळपास 200 पत्रकारांनी मोर्चा काढला होता. या पत्रकारांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यावर कारवाई करण्याचं आश्‍वासन राजनाथ सिंह यांनी दिलंय.

दरम्यान, या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. पटियाला कोर्टाच्या परिसरात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, जेएनयूचे विद्यार्थी आणि शिक्षकांना वकिलांनी मारहाण केली होती. आणि तरीही सरकारने त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी तर यामध्ये कुणी मारलं तर गेलं नाही ना ? असा उलटा सवाल विचारलाय.

तर दुसरीकडे भाजपचे नेते ओ. पी. शर्मा यांच्या समर्थकांवर टीका होतेय. पण मारहाण प्रकरणी कुणावरही कारवाई झालेली नाही. दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी ओ. पी. शर्मा यांचं समर्थनच केलंय. कोर्टाच्या परिसरात वातावरण तापलं होतं आणि त्यामुळे हिंसक कारवाया झाल्या, असं त्यांचं म्हणणं आहे. पण हा सगळा हिंसाचार घडत असताना पोलीस मात्र हे सगळं शांतपणे बघत राहिले. त्यामुळे दिल्ली पोलिसांवरही जोरदार टीका होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2016 10:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close