S M L

झारखंडमध्ये चकमकीत 4 माओवादी ठार

Samruddha Bhambure | Updated On: Feb 19, 2016 02:29 PM IST

maoists attack

19 जानेवारी : झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये 9 तास चाललेल्या चकमकीमध्ये चार माओवादी ठार झाले असून दोन सीआरपीएफ जवान जखमी झाले आहे.

रघागराबेरा गावाजवळ माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्यांच्याविरोधात सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या शोधमोहिम सुरू केली. घटनास्थळी जवान दाखल झाल्यानंतर त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. यावेळी जवान आणि माओवाद्यांमध्ये रात्रभर तब्बल 9 तास चकमक सुरू होती. आज सकाळी 4 माओवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दोन जवान जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2016 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close