S M L

जेएनयूच्या तीन विद्यार्थ्यांना दिसताच क्षणी अटक करा,पोलिसांची लुकआऊट नोटीस

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2016 01:41 PM IST

jnu_4235234नवी दिल्ली - 20 फेब्रुवारी : जेएनयू वादाला आता वेगळं वळण मिळालंय. एकीकडे कन्हैया कुमारच्या विरोधात निदर्शनं सुरू आहे. तर दुसरीकडे देशद्रोहाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 3 विद्यार्थ्यांसाठी लूकआऊट नोटीस काढली आहे. यात डीएसयूच्या उमर खालिदचाही समावेश आहे.

सर्व विमानतळ, बंदरं आणि तपास अधिकार्‍यांना सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे. या तिघांपैकी कुणी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्वरित अटक करा, असं या नोटिशीत म्हणण्यात आलंय.

दरम्यान, शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने कन्हैया कुमारच्या जामिनावर सुनावणीस नकार दिलाय. दिल्ली हायकोर्टातच यावर सुनावणी होणार आहे. सध्या तो न्यायलयीन कोठडीत असून त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2016 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close