S M L

हरियाणात जाट आंदोलनाचा भडका, रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2016 04:38 PM IST

हरियाणात जाट आंदोलनाचा भडका, रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प

हरियाणा - 20 फेब्रुवारी : ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या जाट आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. ठिकठिकाणी जाळोपाळ,लुटालुटीच्या घटना घडल्या आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक कोलमडली असून शाळा कॉलेजस् बंद आहे. लष्काराने फ्लॅग मार्च काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अतितणावग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिसत्याक्षणी गोळ्या मारण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहे.

हरियाणामध्ये जाट आरक्षणाच्या मागणीवरून तणाव वाढतंच चाललाय. सर्व प्रमुख शहरांमध्ये आंदोलकांनी रस्ते बंद पाडले आहे. काही ठिकाणी जाळपोळ होतेय. सर्व प्रमुख महामार्ग ठप्प आहेत. 2000 ते 2500 लोकं रस्त्यावर उतरले आहे. संतप्त जमावाने पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालयं, पेट्रोल पंपाना आग लावून दिलीये. रोहतक, भिवानी, झज्जर, सोनीपत, हिसार, पानीपत, जिंद आणि कैथल इथं परिस्थिती तणावपूर्ण आहे. रोहतक जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडालाय. शुक्रवारी हिंसक जमावाने धुडगूस घातल्यानंतर आज शनिवारीही ठिकठिकाणी तीव्र आंदोलन झाली. आज सकाळी लष्काराला पाचारण करण्यात आलं. ठिकाठिकाणी लष्काराने फ्लॅग मार्च केलं. एक आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जवळपास 550 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल शुक्रवारी या आंदोलनाचा भडका उडाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या आंदोलनात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय.

दरम्यान,आंदोलकांचा कोणीही नेता नसल्यामुळे त्यांना नियंत्रणात आणणं कठीण जातंय. आणि रोहतकमध्ये पोलिसांचं काम आणखी चांगलं होऊ शकलं असतं, अशी कबुली हरियाणाचे डीजीपी यशपाल सिंघल यांनी दिलीय. कालपासून लष्कर बोलावल्यामुळे आता परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे. लष्कर ठिकठिकाणी ध्वज संचलन करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2016 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close