S M L

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला, 2 जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2016 09:07 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला, 2 जवान शहीद

काश्मीर - 20 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकंवर काढलंय. पुलवामा जिल्ह्यातील पामपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले आहे. तर 10 जवान जखमी झाले आहे. 3 जवानांची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी एका सरकारी इमारती घुसले असून चकमक सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पामपोर भागात ईडीआई इमारतीजवळ रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानाच्या बसला लक्ष्य केलं. जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर जवळील दहशतवाद्यांनी तिथल्या सरकारी व्यवसाय विकास केंद्राच्या इमारतीचा ताबा घेतला. जवानांनी अतिरेक्यांना प्रत्युत्तर देण्यास ऑपेरशन हाती घेतलंय. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. या इमारतीतून आतापर्यंत 80 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. दहशतवाद्यांच्या ताब्यात आणखी काहीजण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जवानांनी या इमारताला घेराव घातलाय. या इमारतीमधून दहशतवादी अधून-मधून गोळीबार करत आहे. गोळीबार करण्याची ओळख होऊ शकलेले नाही. अजूनही चकमक सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2016 09:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close