S M L

हरियाणा अजूनही धुमसतंय, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2016 10:01 PM IST

hariyana_jaat (9)हरियाणा - 20 फेब्रुवारी : जाट आरक्षणाच्या आंदोलनाला वणवा अजूनही पेटलेला आहे. आज तिसर्‍या दिवशी आंदोलनं सुरूच आहे. आतापर्यंत या आंदोलनात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. अनेक जण जखमी झाले. तिसर्‍यादिवशी ठिकठिकाणी रास्ता रोको, जाळपोळीच्या घटना घडल्या आहे.

हरियाणामध्ये जाट आरक्षणाच्या आंदोलनाला तिसर्‍या दिवशीही हिंसक वळण लागलंय. आज तिसर्‍या दिवशीही आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी अनेक राष्ट्रीय महामार्ग रोखले आणि रेल्वेही रोखून धरल्यात. रोहतक,भिवानी, झज्जरमध्ये संचारबंदी लागू कऱण्यात आलीये.

या तीन जिल्ह्यामध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहे. तसंच इंटरनेट, एसएसएस सेवाही बंद आहेत. आज सकाळी लष्कराने पाचारण करण्यात आलं. लष्कराने फ्लॅग मॉर्च करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, जाट समाजाच्या आरक्षणांच्या मुद्द्यावरून हरियाणा भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. भाजपचे खासदार राज कुमार सैनी यांनी जाट आरक्षणाला विरोध केला होता. जाट समाज आर्थिकदृष्ट्या सधन असल्याने त्यांना आरक्षण देऊ नये असं त्यांनी म्हटलंय. हरियाणा सरकारने या भूमिकेपासून दूर राहणं पसंत केलंय आणि पक्षाने सैनींना कारणे दाखवा नोटीस दिलीये. सैनी यांच्या घरावर काल रात्री जाट आरक्षण समर्थकांनी हल्ला केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2016 10:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close