S M L

जाट आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत पाणी संकट

Samruddha Bhambure | Updated On: Feb 21, 2016 04:57 PM IST

जाट आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत पाणी संकट

Kejriwal at Delhi Assembly

दिल्ली - 21 फेब्रुवारी : हरियाणातील जाट आरक्षण आंदोलनाचा वणवा दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी हरयाणात सुरु असलेल्या जाट आंदोलनामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाले आहे. दिल्लीत आता पाणी शिल्लक राहिले नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जाहीर केले. पाणी संकटामुळे सोमवारी दिल्लीतील शाळा बंद रहाणार असून, परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दिल्लीला हरयाणातील मुनाक कालव्यातून पाणी सोडलं जातं. मात्र जाट समाजाच्या आंदोलनामुळे मागच्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे दिल्लीकरांना पाणी संकटाला सामोरं जावं लागत आहे. सध्या दिल्ली जल बोर्डाकडे केवळ एका दिवसाचा पाणीसाठा उपलब्ध असल्याचं कळतंय.

दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंळाची तातडीने बैठक बोलावली. मुनाक कालव्यातून पाणी सोडण्याची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि हरयाणाच्या मंत्र्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे केजरीवाल यांनी सांगितलं. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचं आपण आवाहन केल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2016 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close