S M L

हिटरलचं राज्य निर्माण करण्याचा भाजपचा डाव - सुशीलकुमार शिंदे

Samruddha Bhambure | Updated On: Feb 21, 2016 07:15 PM IST

हिटरलचं राज्य निर्माण करण्याचा भाजपचा डाव - सुशीलकुमार शिंदे

पुणे – 21 फेब्रुवारी : दिल्लीच्या जेएनयुमध्ये जो काही अनुचित प्रकार घडत आहे, त्यातून भाजप सरकारचा हिटलर राज्य निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप माजी केंदीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुण्यामध्ये शरद पवारांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलय.

सध्या देशात जे अनुचित प्रकार घडत आहेत, त्यावर भाजपचं नियंत्रणच नाही ही एक मोठी खंत आहे. भाजपला जेएनयू काबिज करायचय, म्हणून एबीव्हीपीच्या शाखा निर्माण केल्या जात आहेत. गुजरातमध्ये पटेल समाजाचे आंदोलन, हैदराबाद इथल्या विद्यार्थ्याची आत्महत्या आणि आता जेएनयू प्रकरणात राहूल गांधी भेटायला गेले तर लगेच त्यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात येत असून, हे एक प्रकारे सुडाचे राजकारण देशात चालू आहे. राजस्थानमध्ये एक आमदार राहुल गांधींना गोळ्या झाडा असं म्हणाला, त्यावरून हे सिद्ध होतं की, सध्याच भाजपाचं सरकार हिटलर सारख वागत असल्याचंही ते म्हणाले.

युपीएच्या काळात मनमोहन सिंग यांनी सामाजिक दृष्टीकोनातून देशात शांतता निर्माण केली होती. तसंच देशाच्या सीमा चांगल्याप्रकारे बळकट झाल्या होत्या. पण, सध्या भाजपमुळे देशात अशांतता निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये थेट जवानांच्या गाडीवरच गोळीबार करण्यात आला त्यावेळी भाजपचे गुप्त विभाग काय करत होते. देशातील सरहद्दी व अंतर्गत सुरक्षा देखील बळकट करण्यात सरकारला अपयश असून, एकप्रकारे बेफिकीरीने सरकार चालवत आहेत.

तसंच, अनेकवेळा विनंती करून देखील सरकार काँगेसबरोबर चर्चा करायला तयारच होत नाही. अशा चर्चांमुळे देशातील अनेक प्रश्न सहजपणे सुटतील हे मान्य करायला भाजप तयार नाही. अपेक्षांचं ओझं घेऊन भाजप देशात सत्तारूढ झाला आहे. मात्र, सत्ता स्थापल्यापासून देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या दोन वर्षांत मोदींनी जनतेला दिलेले एकही अश्वासन पूर्ण केलं नसून, यातच भाजपचं अपयश स्पष्ट दिसत आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2016 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close