S M L

येत्या अधिवेशनात जाट आरक्षणाचं विधेयक मांडण्याचं हरियाणा सरकारचं आश्वासन

Samruddha Bhambure | Updated On: Feb 21, 2016 08:56 PM IST

येत्या अधिवेशनात जाट आरक्षणाचं विधेयक मांडण्याचं हरियाणा सरकारचं आश्वासन

Jat Agitation For OBC Status

हरयाणा – 21 फेब्रुवारी : हरयाणातील जाट समाजाच्या हिंसक आंदोलनापुढे झुकत सरकारने जाट समाजाला आरक्षण देण्याची हमी दिली आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात या आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असं आश्वासन जाट नेत्यांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं.

राजनाथ यांनी जाट आरक्षणाची मागणी मान्य करताना आंदोलन मागे घ्यावं, असं कळकळीचे आवाहनही या समाजाला केलं आहे. आज दुपारी केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांच्यासह हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील भाजपच्या जाट नेत्यांनी राजनाथ यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे हरयाणा प्रभारी अनिल जैन यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात जाट समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली. जाट आरक्षणावर केंद्र सरकार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केलं. संजीव बलियान यांनीही या माहितीला दुजोरा दिला. बलियान हेच उच्चस्तरीय समितीचे प्रमुख असणार आहेत.

दरम्यान, आरक्षणबाबतच्या निर्णयानंतर जाट आंदोलन निवळण्याची शक्यता आहे. या आंदोलनात आतापर्यंत 10 आंदोलकांचा मृत्यू झाला असून 150 पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. हरयाणातील6 शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलीस आणि सुरक्षादलांनी ध्वजसंचलनही केलं. या आंदोलनाचे पडसाद अन्य राज्यांमध्येही दिसू लागेल आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनी राजनाथ यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2016 08:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close