S M L

हरियाणामधून अखेर दिल्लीसाठी पाणी सोडलं

Sachin Salve | Updated On: Feb 22, 2016 04:51 PM IST

हरियाणामधून अखेर दिल्लीसाठी पाणी सोडलं

दिल्ली - 22 फेब्रुवारी : हरियाणाला जेरीस आणणारं जाट आंदोलन काही संपायचं नाव घेत नाहीये. या आंदोलनामुळे दिल्लीकरांना मोठा फटका बसला होता. आंदोलकांनी मानक कालव्यावर ताबा मिळवल्यामुळे दिल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला होता. अखेर आज सैन्याने कालव्याचा ताबा मिळल्यामुळे पाणीपुरवठा सुरू झालाय.

दिल्लीला अखेर पाणी मिळायला सुरुवात झाली आहे. रविवारी दिल्लीला पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद होता. हरियाणातल्या मानक कालव्यावर आज सैन्यानं ताबा मिळवला, आणि तिथे अजूनही लष्कर तैनात आहे. जाट आंदोलकांनी काल हा पाणी पुरवठा बंद केला होता. म्हणून देशाची राजधानीत 24 तासांहून जास्त वेळ पाणीच नव्हतं. पुढचे काही दिवस दिल्लीच्या रहिवाशांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन करण्यात आलंय. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानक कालव्यावर ताबा मिळवल्याबद्दल लष्कर आणि केंद्राचे आभार मानले, तसंच हा दिल्लीसाठी मोठा दिलासा आहे असं ट्विट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close