S M L

कन्हैया कुमारच्या जामिनाला दिल्ली पोलिसांचा विरोध; उद्या होणार सुनावणी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 23, 2016 12:31 PM IST

KANHAIYA-KUMAR-facebook

दिल्ली – 23 फेब्रुवारी : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीन अर्जावरची सुनावणी दिल्ली हाय कर्टाने उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारच्या जामीनाला विरोध केला आहे. तर, कोर्टाने दिल्ली पोलिसांना उद्यापर्यंत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

कन्हैया कुमारची जामीन याचिका सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाकडे वर्ग करून या प्रकरण योग्य रीतीने हाताळण्याचे आदेश दिले होते. जेएनयूमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्याचा कन्हैया कुमारवर आरोप असून, दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला दाखल केला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारविरोधात 4 पुरावे कोर्टाकडे सादर केले आहेत. हा रिपोर्ट सीएनएन आयबीएनच्या हाती लागला आहे.

  • कन्हैया कुमार देशाविरोधात घोषणाबाजी करत होता, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. एका खासगी वृत्तवाहिनीकडून मिळालेल्या फुटेजच्या आधारावर हा दावा करण्यात आलाय.
  • हा कार्यक्रम साबरमती आणि गंगा धाबा इथं आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला कन्हैया कुमार हजर असल्याचं प्रत्यक्षदशीर्ंनी म्हटलंय.

    अफझल गुरूच्या स्मरणार्थ आयोजित करण्यासाठी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. पुढच्या गेटमधून त्या मिरवणुकीला जाऊ द्यावं असं

  • कन्हैया कुमारनं सुरक्षा रक्षकांना सांगितलं. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकला असता.
  • जेएनयूच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला प्रथमदर्शनी कन्हैया कुमारसह 8 विद्यार्थ्यांनी गुन्हा केल्याचं आढळलंय.
  • त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा गैरअर्थ लावणं, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणं, विद्यापीठ आवारात कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का बसेल अशी परिस्थिती निर्माण करणं, असंवैधानिक घोषणाबाजी आणि शेरेबाजी करणं यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, उमर खालिद आणि इतर 4 विद्यार्थ्यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी सुरक्षा देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्यानं आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. कोर्टानं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं मान्य केलंय. कालच या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात अर्ज करायचा प्रयत्न केला होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे त्यांना तो दाखल करता आला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2016 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close