S M L

कन्हैया कुमारला जामीन मिळणार का ? उद्या होणार सुनावणी

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2016 06:49 PM IST

कन्हैया कुमारला जामीन मिळणार का ? उद्या होणार सुनावणी

दिल्ली - 23 फेब्रुवारी : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर आता उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे कन्हैया कुमारची बाजू मांडण्यासाठी कोर्टात दाखल झाले आहेत. कन्हैयाला जामीन मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

शुक्रवारी कन्हैयानं जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका दाखल करून घ्यायला नकार दिला होता. न्यायालयीन प्रक्रियेनुसार कन्हैया कुमारनं हायकोर्टाकडे जावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. कन्हैया सध्या न्यायलयीन कोठडीत असून त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारविरोधात 4 पुरावे कोर्टाकडे सादर केले आहेत. हा रिपोर्ट सीएनएन आयबीएनच्या हाती लागला आहे.

1. कन्हैया कुमार देशाविरोधात घोषणाबाजी करत होता, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. एका खासगी वृत्तवाहिनीकडून मिळालेल्या फुटेजच्या आधारावर हा दावा करण्यात आलाय.

2. हा कार्यक्रम साबरमती आणि गंगा धाबा इथं आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला कन्हैया कुमार हजर असल्याचं प्रत्यक्षदशीर्ंनी म्हटलंय.

3. अफझल गुरूच्या स्मरणार्थ आयोजित करण्यासाठी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. पुढच्या गेटमधून त्या मिरवणुकीला जाऊ द्यावं असं कन्हैया कुमारनं सुरक्षा रक्षकांना सांगितलं. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकला असता.

4. जेएनयूच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला प्रथमदर्शनी कन्हैया कुमारसह 8 विद्यार्थ्यांनी गुन्हा केल्याचं आढळलंय.

5. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा गैरअर्थ लावणं, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणं, विद्यापीठ आवारात कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का बसेल अशी परिस्थिती निर्माण करणं, असंवैधानिक घोषणाबाजी आणि शेरेबाजी करणं यांचा समावेश आहे.

तर जेएनयूच्या रजिस्ट्रारनी सांगितलंय की, या घटनेच्या फुटेजवरून काही गोष्टी स्पष्ट झाल्यात. या घटनेची चौकशी करणार्‍या उच्च स्तरीय पॅनेलनं रजिस्ट्रारना 8 ते 10 फोटो पाठवलेत. हे लोक बाहेरचे होते. त्यांची ओळख पटवण्यासाठी हे फोटो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये फिरवण्यात येणार आहेत. घटनेच्या फुटेजवरून हे फोटो घेण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2016 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close