S M L

रोहित वेमुला प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2016 01:18 PM IST

 रोहित वेमुला प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली - 24 फेब्रुवारी : हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला हत्याप्रकरणाच्या मुद्यावरून विरोधकांनी आज राज्यसभेत प्रचंड गेंधळ घातला. सरकारने या प्रकरणावर चर्चेची तयारी दर्शविल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आलं.

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळपासून संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाले. पंतप्रधान लोकसभा सभागृहात उपस्थित आहेत. राज्यसभेत बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी हैदाराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा मुद्या उपस्थित करून सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकार विद्यार्थ्यांवर आरएसएसची विचारधारा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मायावतींनी केला. त्यातूनच रोहित आत्महत्येस प्रवृत्त झाला असून या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी मायावतींनी केली. त्यासोबतच जेएनयू वादावर बोलताना मायावतींनी केंद्रीय शिक्षण मंत्री स्मृती इरानी यांच्या राजीनाम्याची केली. तसंच या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित करून मायावती यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत करत विरोधक वेलमध्ये उतरले आणि गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

दरम्यान, सरकारने वेमुला प्रकरणावर चर्चेची तयारी दर्शविली मात्र, तरीही विरोधकांनी गोंधळाचे वातावरण कायम ठेवल्याने सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2016 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close