S M L

अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार

11 फेब्रुवारीविधिमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. ते दिल्लीत बोलत होते. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 मार्चपासून सुरू होणार आहे.गेल्या वर्षी आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात काही मंत्रिपदे रिक्त आहेत. यात काँग्रेसला 4 कॅबिनेट मंत्रिपदे हवी आहेत. मंत्रिपदांसाठी संभाव्य नावांमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव आघाडीवर आहे. तर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावरील मधू कोडा प्रकरणाचे सावट दूर झाल्यानंतर त्यांनाही मंत्रिपदाचा लाभ होण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजाला न्याय मिळावा म्हणून बसवराज पाटील यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय अमरीश पटेल, रामप्रसाद बोर्डीकर, यशोमती ठाकूर, भाई जगताप, कालिदास कोळंबकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. काँग्रेसमधील 'एक व्यक्ती एक पद' या तत्त्वानुसार माणिकराव मंत्री झाले, तर प्रदेशाध्यक्षपदी कोण याची आत्ताच चर्चा सुरू झाली आहे. त्यात विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय बाळासाहेब शिवरकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर दलित चेहरा समोर आणण्यासाठी नितीन राऊत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यतआहे. शिवाजीराव मोघे यांनाही मंत्रिमंडळातून वगळून प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2010 01:48 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2010 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close