S M L

रेल्वे बजेटमधील 15 ठळक मुद्दे, जे प्रवाशांच्या फायद्याचे...

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2016 08:30 PM IST

 रेल्वे बजेटमधील 15 ठळक मुद्दे, जे प्रवाशांच्या फायद्याचे...

25 फेब्रुवारी : स्लिपरप्रमाणे आता जनरल बोगीमध्येही मोबाईल चार्जिंग, ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ आरक्षण अशा सर्वसामान्यांना प्रवाशांच्या गरजा ओळखून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेटमध्ये घोषणा केल्यात. एवढंच नाहीतर गेली कित्येक दशक हमाल म्हणून हिणवणार्‍या कर्मचार्‍यांना सहाय्य अशी नवी ओळखही सुरेश प्रभू यांनी दिली आहे. रेल्वे बजेटमधील हे टॉप 15 मुद्दे...

1) हमसफर, तेजस आणि उदय या तीन नव्या आरक्षित गाड्यांची घोषणा

2) आता जनरल बोगीमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा देणार

3) चर्चगेट - विरार आणि सीएसटी - पनवेल असे मुंबईसाठी होणार दोन नवे उपनगरीय कॉरिडॉर

4) 100 स्थानकांवर वायफाय सेवाही देणार, गुगलची घेणार मदत

5) ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कोट्यात 50 टक्के वाढ करणार

6)  प्रत्येक श्रेणीत महिलांना मिळणार 33 टक्के आरक्षण कोटा

7) हमालांना आता नवा गणवेश मिळणार, यापुढे हमालांना सहाय्य अशी ओळख

8) रेल्वेला यावर्षी 17 हजार नवे बायो टॉयलेट्स मिळणार. अपंगासाठी पुरवणार विशेष शौचालयांची सेवा

9) रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा होणार वापर

10) डब्यांमधल्या स्वच्छतेसाठी नवी 'क्लीन माय कोच' एसएमएस सेवा

11) तात्काळ तिकीटांच्या काउंटरवर सीसीटीव्ही लावणार

12) बेबी फूड, दूध आणि गरम पाणी लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध करुन देणार

13) भारतभर महिलांसाठी 24 तास हेल्पलाईन - सुरेश प्रभू

14) रेल्वेत एटीव्हिएम मशीन डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करता यावासाठी अद्यायावत सेवा देणार

15) रेल्वेत एफएम रेल्वे सेवा सुरू करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2016 07:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close