S M L

मी देवीची भक्त, स्मृती इराणींच्या महिषासूर पत्रकावरुन गदारोळ

Samruddha Bhambure | Updated On: Feb 26, 2016 02:08 PM IST

मी देवीची भक्त, स्मृती इराणींच्या महिषासूर पत्रकावरुन गदारोळ

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : राज्यसभेच्या आजच्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवातही गदारोळनंच झाली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी वाचलेल्या महिषासूर पत्रकावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच स्मृती इराणी यांनी यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं.

जेएनयू प्रकरणावर लोकसभेत बोलताना स्मृती इराणी यांनी महिषासूर पत्रक वाचून दाखवलं होतं, ज्यामध्ये दुर्गा देवीबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला होता. स्मृती इराणी यांनी देवीचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला.

स्मृती इराणींनी यावर स्पष्टीकरण देत, मला सत्य सांगायचं होत म्हणून मी ते पत्रक वाचलं. मीदेखील देवी दुर्गाची भक्त आहे आणि ते वाचताना मलादेखील खुप यातना झाल्या. विद्यापीठातील अधिकृत कागदपत्रांपैकीच ते एक होतं' असं सांगितल. मात्र विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवला. दरम्यान, मुख्तार अब्बास नक्की यांनी विरोधक सातत्याने माफीची मागणी करीत आहेत. त्यांना सभागृहात इतर काही कामकाज करायचे आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

तर राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरिअन यांनी कोणत्याही समुदायाविरोधात काहीही न बोलण्याची या सभागृहाची परंपरा असल्याचे सांगत वादग्रस्त टिप्पणी तपासण्यात येईल आणि त्यामध्ये काही आक्षेपार्ह असल्यास ते कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे स्पष्ट केलं..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2016 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close