S M L

स्मरण यशवंतरावांचे...

12 मार्चआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज 97 वी जयंती आहे.यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12मार्च 1913 साली सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र इथे झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसैनिक, सहकार चळवळीचे प्रणेते, लेखक अशी त्यांची ओळख. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ऍग्रीकल्चरल सिलींग ऍक्ट अमलात आणला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदानतंर भारताचे उपपतंप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला होता. यशवंतराव चव्हाण म्हणजे राजकारणातले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. चीन आक्रमणाच्या संकटात सापडलेल्या हिमालयाला महाराष्ट्राच्या या सह्याद्रीने आधार दिला. या महान नेत्याची कायमस्वरुपी आठवण राहावी म्हणून कराडमधील त्यांच्या घरी त्यांच्या वस्तूंचे जतन केले जात आहे. त्यात प्रामुख्याने आहेत, ती यशवंतरावांची पत्रे. सर्व नामांकीत व्यक्तींनी लिहिलेली पत्रे यशवंतरावांच्या अफाट लोकसंग्रहाची साक्षीदार बनली आहेत. वेणूताई चव्हाण स्मारकामध्ये यशवंतरावांच्या विविध वस्तूंचे जतन केले जात आहे. यात त्यांचे ग्रंथालय, त्यांना मिळालेली प्रशिस्ती पत्रे, मोटारगाडी तसेच विविध देशांकडून त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे. या वस्तू या लाडक्या लोकनेत्याच्या आठवणी जागवतील, आणि अभ्यासकांनाही मदत करतील असा विश्‍वास संग्राहकांना वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2010 09:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2010 09:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close