S M L

'इशरत जहाँ प्रकरणाचं काँग्रेसनं राजकारण केलं'

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2016 11:58 PM IST

rajya-sabha2-ptiनवी दिल्ली - 26 फेब्रुवारी : इशरत जहाँ प्रकरणावर आज (शुक्रवारी) संसदेत गदारोळ झाला. माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी आक्षेप घेतला. इशरत जहाँ प्रकरणावरून काँग्रेसनं राजकारण केलं असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही ब्लॉग लिहून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. तत्कालीन गुजरात सरकारला अस्थिर करण्यासाठी गुजरात पोलिसांचे अधिकारी कटकारस्थान करत होते असा आरोप जेटली यांनी केलाय. इशरत प्रकरणावरून सीबीआय विरूद्ध आयबी असं भांडण लावण्याचं कामही यूपीए सरकारनं केलं असा आरोपही जेटलींनी केला. त्यामुळं हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2016 11:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close