S M L

जेएनयूच्या 'त्या' व्हिडिओमध्ये फेरफार, फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये खुलासा

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2016 10:01 AM IST

जेएनयूच्या 'त्या' व्हिडिओमध्ये फेरफार, फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये खुलासा

नवी दिल्ली - 02 मार्च : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये 9 फेब्रुवारीला झालेल्या वादग्रस्त कार्यक्रमाच्या काही व्हिडिओ क्लिप्समध्ये फेरफार केल्याचं आढळून आलंय असं वृत्त पीटीआयने दिलंय.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार एकूण सात व्हिडिओ क्लिप्सपैकी दोन क्लिप्समध्ये असा फेरफार आढळला आहे. या क्लिप्समध्ये नसणार्‍या काही व्यक्तींचे आवाज यात मिसळले गेले आहेत असं आढळून आलंय. दिल्ली सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.त्यानुसार या क्लिप्सची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्या हैद्राबादमधल्या एका फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. या लॅबच्या अहवालात हा खुलासा समोर आलाय. या आधीही बाहेरच्या व्यक्तींकडून देशाविरोधात घोषणा देण्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला होता. त्यामुळे केजरीवाल सरकारने या प्रकरणाची व्हिडिओ क्लिप्सची सत्यता पडताळून पाहण्यासाठी टेप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या होत्या. दरम्यान, कन्हैया कुमारच्या जामीनाविषयी दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. तसंच यासाठी जेएनयूचे विद्यार्थी संसदेवर मोर्चाही काढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2016 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close