S M L

इशरतच्या प्रतिज्ञापत्रावर सहीसाठी 'यूपीए'नं छळलं, मणींचा खुलासा

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2016 12:26 PM IST

इशरतच्या प्रतिज्ञापत्रावर सहीसाठी 'यूपीए'नं छळलं, मणींचा खुलासा

नवी दिल्ली - 02 मार्च : इशरत जहाँ प्रकरणावरून पुन्हा राजकारण पेटलंय. गृह विभागाचे माजी अंडर सेक्रेटरी आर.व्ही.एस मणी यांनी यासंदर्भात एक खळबळजनक दावा केलाय. इशरत जहाँ ही दहशतवादी असल्याचा ठोस पुरावा नसल्याचं प्रतिज्ञापत्र आधीच्या यूपीए सरकारनं कोर्टात दाखल केलं होतं. त्यावर सही करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता आणि छळ केला होता असा आरोप मणी यांनी केलाय. आपल्याला शारिरीक त्रास देण्यात आला असं मणी यांनी म्हटलं आहे. या आरोपांमुळे या प्रकरणातली गुंतागुंत वाढली आहेच, तसंच काँग्रेसही अडचणीत आली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात धुराळं उडवणार्‍या काँग्रेसला पी. चिदंबरम यांच्यासाठी बॅकबुटवर यावं लागलंय. गृह विभागाचे माजी अंडर सेक्रेटरी आर.व्ही.एस मणी यांच्या खुलाशामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मणी यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी आपल्याला यूपीए सरकारने शारिरीक त्रास देण्यात आला असा खुलासा केलाय. त्यावेळी पी. चिदंबरम हे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री होते. त्यामुळे मणी यांनी चिदंबरम यांच्याकडे बोट दाखवलंय.

प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी ते माझ्यावर जबरदस्ती करत होते. मी म्हटलं की, सही कर हे सांगण्यासाठी मला गुप्तचर विभागाची गरज नाही. माझ्या विभागातले अधिकारी सक्षम आहेत. पण त्यांनी माझं ऐकलं नाही असं मणी यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी भाजपनं संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेसाठी नोटीस दिली आहे. या प्रकरणी चिदंबरम यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भाजप आणि मित्र पक्ष करत आहेत. गेल्याच आठवड्यात माजी गृह सचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी इशरत जहाँ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला होता. त्यांच्यानंतर मणी यांनी हा आरोप केल्यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2016 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close