S M L

'स्फोटाला सगळेच जबाबदार'

13 मार्चपुण्यातील जर्मन बेकरीतील बॉम्ब स्फोटाला 1 महिना पूर्ण झाला आहे. पण याबाबत पोलिसांना अजूनही धागेदोरे मिळत नाहीत. उलट या स्फोटाला जर्मन बेकरीच्या मालकापासून, पोलिसांपर्यंत सगळेच जबाबदार आहेत असे, पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंग यांनी म्हटले आहे. बॅग दीड तास जर्मन बेकरीत पडून होती, तरी तिच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही असेही सत्यपालसिंग यावेळी म्हणाले. तपासाला यश नाहीपुण्यात स्फोट झाल्यानंतर देशाचे गृहमंत्री , राज्याचे मुख्यमंत्री सगळेच पुण्यात धावले. तपासयंत्रणा कामाला लागल्या. पण गेल्या एक महिन्यात काडी एवढीही माहितीही एटीएस अथवा पुणे पोलिसांना मिळालेली नाही. पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासाची जबाबदारी एटीएसकडे सोपवण्यात आली. त्यांच्या मदतीला पुणे पोलीसही होते. एटीएसची तीन आणि पुणे पोलिसांची तीन अशी सहा पथके पुण्यात कामाला लागली. एनआयए ,आयबी, सीबीआयचे अधिकारीही तपास करत आहेत.पण अजून तरी कुणालाही यश मिळालेले नाही. अल अलामीचा दावाया घटनेची जबाबदारी पाकिस्तानातील लष्कर-ए- तय्यबा अल अलामी या संघटनेने घेतली होती. अल कायदा संघटनेतून वेगळा झालेला हा आमचा आक्रमक ग्रुप आहे. आम्हीच हे काम केले असे या संघटनेच्या व्यक्तीने फोन करुन एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला सांगितले होते. त्याचाही पोलिसांनी तपास केला. पण तो दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे पोलीस आता सांगत आहेत.दहशतावादाशी मुकाबल्याची शपथस्फोटाला आज एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यात 'ओन्ली माय सीटी ' या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात डीएड कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीच्या शेवटी पुणेकरांनी दहशतवादाचा निर्भयतेने सामना करण्याची शपथ घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2010 09:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2010 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close