S M L

दिल्ली पोलिसांना झटका, कन्हैया कुमारला जामीन मंजूर

Samruddha Bhambure | Updated On: Mar 2, 2016 08:51 PM IST

KANHAIYA-KUMAR-facebook

दिल्ली - 02 मार्च : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला दिल्ली हायकोर्टाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कन्हैया कुमारला जामीन मंजूर होणं हा दिल्ली पोलिसांसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कन्हैया कुमारला 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर झाला असून, दिल्ली पोलिसांनी त्याला चौकशीत सहकार्य करण्यास सांगितलं आहे.

जेएनयूमध्ये आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैया कुमारसह 6 विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली पोलिसांनी 2 आठवड्यांपूर्वी कन्हैयाला अटक केली होती. कन्हैयानं दिल्ली हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर काल, मंगळवारी झालेल्या सुनावणीत निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं त्याला 6 महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2016 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close