S M L

काल लोकसभेत असते तर राहुल गांधींना ऐकवलं असतं - सुषमा स्वराज

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2016 02:53 PM IST

काल लोकसभेत असते तर राहुल गांधींना ऐकवलं असतं - सुषमा स्वराज

नवी दिल्ली् - 03 मार्च : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरकडे रवाना झाले होते तेव्हा त्यांनी मला फोन केला होता आणि माहिती दिली होती असं सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच जर मी काल लोकसभेत उपस्थित असते तर तिथेच राहुल गांधी यांना उत्तर दिलं असतं असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक पाकिस्तान भेटीवर गेल्याची माहिती कोणालाच नव्हती, अशी टीका राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केली होती. सुषमा स्वराज यांना तरी या भेटीची कल्पना होती की नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यावरून सुषमा स्वराज नाराज झाल्या आहेत. राहुल यांनी हे विधान केलं तेव्हा मी सभागृहात नव्हते, असते तर त्यांना तिथंच उत्तर दिलं असतं असंही त्या म्हणाल्या. ज्या वेळी लाहोर जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं त्यानंतर लगेच पंतप्रधान मोदींचं आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं. मोदींनी या भेटीबद्दल माझा सल्लाही जाणून घेतला होता अशी माहितीही स्वराज यांनी दिली. मोदी जेव्हा भारतात परतले तेव्हा मी स्वत: विमानतळावर हजर होते. मोदींनी या भेटीबद्दल माझ्यासोबत चर्चाही केली असंही स्वराज यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close