S M L

राजीव गांधींचं म्हणाले होते,'संसद चालू द्या', मोदींचं काँग्रेसवर शरसंधान

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2016 04:41 PM IST

राजीव गांधींचं म्हणाले होते,'संसद चालू द्या', मोदींचं काँग्रेसवर शरसंधान

नवी दिल्ली - 03 मार्च : 'आमचे महात्मा गांधी तर तुमचे सावरकर' काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) लोकसभेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पंडित नेहरू यांच्या भाषणाचा उल्लेख करत काँग्रेसवर शरसंधान साधलं.  तसंच  इथं काही तेजस्वी, अभ्यासू, विचारवंत सदस्य आहे. अशा अभ्यासू खासदारांना बोलू दिलं जात नाही असं म्हणत मोदींनी राहुल गांधींचा उल्लेख न करता टीका केली. गरिबीचं मुळं खूप खोल पोहोचलंय. त्यामुळंच गरिबी दूर होऊ शकत नाही आणि याचं श्रेयही काँग्रेसलाच दिले पाहिजे असा आरोपही मोदी यांनी केला. परंतु, मोदी यांनी जेएनयू प्रकरण आणि रोहित वेमुला प्रकरणावर भाष्य करण्याचं मात्र टाळलं.

जेएनयू, रोहित वेमुला प्रकरणामुळे टीकेचं धनी बनलेलं भाजप सरकार लोकसभेत विरोधकांच्या रडारवर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मैदानात उतरले. मोदींनी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर दिलं. मोदींनी आधी सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला. लोकसभेत गोंधळ सुरू राहिला तर देशाचं आणि सदस्यांचं नुकसान होतं. सभागृहात आधी जे काही झालं त्यामुळं देश चिंतेत आहे. संसद बंद पडली तर देशाचं नुकसान होतं असं मत राजीव गांधींनी आपल्या भाषणात व्यक्त केलं होतं असा उल्लेख करत काँग्रेसला एकच हादरा दिला. काँग्रेसने यावर आक्षेप घेतला पण, आता मला बोलू द्या असं म्हणत मोदी आपलं भाषण सुरू ठेवलं. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख केला. संसदेचं कामकाज झालं पाहिजे हे जवाहरलाल नेहरूंनीही सांगितलं होतं आणि आपल्याला मोठ्यांनी सांगितलेले सल्ले ऐकले पाहिजेत असा चिमटाही काँग्रेसला काढला.

'राहुल गांधी अभ्यासू,मनोरंजन करणारे खासदार'

सभागृहात नव्याने आलेल्या खासदारांना बोलू दिलं पाहिजे. पहिल्यांदा निवडून आलेल्या, सदस्यांना एका सत्रात, एक आठवड्यात बोलण्याची संधी द्यावी. प्रत्येक अधिवेशनात काही महत्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी आणि धोरण ठरवावं हे सर्वच सरकारांसाठी गरजेचं आहे. पण, विरोधकांच्या मनात न्यूनगंड त्यामुळं सभागृह चालू दिलं जात नाही. इथं काही तेजस्वी आणि अभ्यासू खासदार आहे. त्यांना बोलू दिलं जात नाही. काही खासदार तर मनोरंजनही करतात अशी टीकाही मोदी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख न करता केली. तसंच मेक इन इंडिया देशासाठी आहे पण तुम्ही त्यांची खिल्ली उडवता. पंतप्रधानांचं पत्र पत्रकार परिषदेत फाडतात हीच तुमची संस्कृती आहे का ? असा सवालही मोदींनी राहुल यांचा उल्लेख न करता विचारला.

'गरिबी दूर न होणं याचं श्रेयही काँग्रेसलाच'

होय, मनरेगा हे आपल्या अपयशाचं प्रतिकच आहे. मनेरगामध्ये भ्रष्टाचार झाला याच्याशी मी 1000 टक्के सहमत आहे. या योजनेचा लाभ गरिबांपर्यंत पोहचलाच नाही. आज 60 वर्षानंतरही गरिबांना खड्डे खोदण्यासाठी पाठवलं जातं, हे अपयश नाही तर काय ? आहे. आम्ही यातल्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मनरेगासाठी जास्त निधी उपलब्ध करून दिला. गरिबीचं मुळे खूप खोल पोहोचलंय. त्यामुळेच गरिबी दूर होऊ शकत नाही आणि याचं श्रेयही काँग्रेसलाच दिलं पाहिजे असा आरोपही मोदींनी केला.

100 दिवस रोजगाराची हमी हे उद्दिष्ट कधीच यशस्वी झालं नाही. आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम कसं करू शकता याचं शल्य काँग्रेसला आहे. तुमची अपूर्ण कामं आम्ही पूर्ण करतोय. रेल्वे मी सुरू केली असं मी म्हणू शकत नाही पण तुम्ही म्हणू शकता असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.

'आरोपांची आता सवय झाली'

आमच्या कार्यकाळात राज्यांना 1 लाख 41 हजार 340 कोटी रूपये जास्त दिले. 28 टक्के जास्त रक्कम राज्यांना दिली गेली आहे. पण, यावर कुणी काही बोलत नाही. माझ्यावर टीका केली जाते, आरोप केले जातात. पण, गेली 14 वर्ष असे आरोप-प्रत्यारोप मी झेलत आलोय, त्यामुळं आरोपांची सवय झालीय असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. भाषणाच्या शेवटी मोदींनी सरकार येतील आणि जातीलही पण देशासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं आवाहनही केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close